Breaking News

"परिवर्तन पुस्तक केंद्र" चळवळीचे केंद्र बिंदू ठरणार - भन्ते धम्मशील

पुस्तक केंद्रास भन्ते धम्मशील यांची सदीच्छा भेट;  सोनवणे यांनी परिवर्तनवादी पुस्तक भेट देऊन केले स्वागत 

बीड : फुले-शाहू -आंबेडकर विचारधारेचे बीड जिल्ह्यातील एकमेव असलेल्या परिवर्तन पुस्तक केंद्रास शुक्रवारी (दि.४) रोजी सांची बुद्ध विहाराचे भन्ते धम्मशील यांनी सदिच्छा भेट दिली.  आंबेडकरी चळवळीचे  हे पुस्तकालय, चळवळीचे केंद्र बिंदू ठरणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

सिद्धांत जनरल स्टोअर्स व परिवर्तन पुस्तक केंद्राचे संचालक तथा पत्रकार सुधाकर सोनवणे यांच्या पुस्तक केंद्रास आज भन्ते धम्मशील यांनी सदीच्छा भेट दिली असता त्यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी भन्तेना परिवर्तनवादी पुस्तक भेट देऊन सुधाकर सोनवणे यांनी त्यांचं स्वागत केलं. भन्ते धम्मशील यांनी यावेळी केंद्रातील विक्रीस उपलब्ध असलेल्या  नामवंत लेखकांच्या पुस्तकांची माहिती घेत, जी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक पुस्तके वाचकांना मिळत नाहीत ती, आता बीड मध्ये सोनवणे यांनी उपलब्ध करून दिली असल्याने समाधान व्यक्त केले. 
समाजातील सर्वांनी या पुस्तक केंद्रातून पुस्तक घेऊन प्रबुद्ध व्हावे आणि चळवळ गतिमान करावी असेही त्यांनी सांगितले. हे केंद्र आशा टॉकीज चौक धानोरा रोड, पंढरी समोर बीड येथे असून या केंद्रात सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.  त्यामुळे पुस्तकासाठी आता पुण्या मुंबईला जाण्याची गरज नसल्याचेही भन्ते धम्मशील यांनी सांगितले.

1 comment: