Breaking News

महिला व बालविकास क्षेत्रातील महाराष्ट्राची कामगिरी अफगाणिस्तानसाठी मार्गदर्शक ठरेल - ॲड.यशोमती ठाकूर



मुंबई : भारत तसेच महाराष्ट्राशी अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध आहेत. महिला व बालविकासाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चांगल्या कामगिरीच्या संकल्पना, कौशल्य अफगाणिस्तानला पुरविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. परस्पर सहकार्याच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांची अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत श्रीमती झकिया वार्दक यांनी भेट घेतली.

          


महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाची अफगाणिस्तानमधील महिला मंत्रालयासोबत ऑनलाईन बैठक व्हावीअशी अपेक्षा व्यक्त करुन श्रीमती वार्दक म्हणाल्याराज्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरणाचे कार्यक्रम कशा पद्‌धतीने राबविले जात आहेत याची माहिती अफगाणिस्तानच्या मंत्रालयाला याद्वारे मिळू शकेल.

          ॲड. ठाकूर म्हणाल्याअफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील महिला व बाल सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांची माहिती अफगाणिस्तानला या क्षेत्रातील धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. महिला सक्षमीकरणासाठी विचारांचे आदान-प्रदान आवश्यक असून त्यासाठी लवकरच ऑनलाईन बैठक करण्यात यावीअसेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी यावेळी उपस्थित होत्या.


No comments