Breaking News

गायरान जमिनी नावावर करा : केज तहसील कार्यालया समोर गायराणधारकांचे उपोषण

गौतम बचुटे । केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान धारक मागील २५ वर्षा पासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ती कसून आपल्या कुटुंबातील उपजिवीका करीत आहेत. त्या अतिक्रमित गायरान जमिनीची नोंद अतिक्रमण धारकांच्या नावाने महसुली अभिलेल्याला घेण्यात यावी या मागणी करीता लाडेगाव येथील अतिक्रमनधारक केज तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

केज तालुक्यातील लाडेगाव येथील मागास प्रवर्गातीलखरीप व रब्बी हे दोन्ही हंगामातील पिके घेत असतात . सदरील कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह या जमिनीवर अवलंबून असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी शासनदरबारी आपली कैफियत व मागण्या मांडून सदरील जमिनीच्या ७ / १२ वर नावे लावून नोंदवावीत ही मागणी केली आहे . यापूर्वी २००७, २००८, २०१४ व २०१५ मध्ये १-ई रजिष्टरला नोंद शासन दप्तरी केली गेली होती. परंतु २०१५ नंतर शासनाने यांची कोणतीही दखल किंवा नोंद घेतलेली नाही. याची शासनाने नोंद घ्यावी. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, प्रा . शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केज वंचित आघाडी व सदरील गायरान धारक यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दि. ३० सप्टेंबर बुधवार पासून केज तहसील समोर करण्यात येणार आहे.

दरम्यान उपोषणाला जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष पूर्व अनिल डोंगरे, पश्चिम प्रा. शिवराज बांगर, भीमराव दळे, केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी भेट दिली. त्यांचे सोबत अजय भांगे, उत्तम वाघमारे, बाबा मस्के हे होते. उपोषणार्थीत विशाल धीरे, नवनाथ पोळ, अक्षय गोटेगावकर यांच्या सह पुरुष व महिला अतिक्रमणधारक हे उपोषणार्थी उपोषणाला बसले आहेत.


No comments