Breaking News

पावसामुळे नुकसान झालेल्या उसाचे व इतर पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या:- दत्ता वाकसे


जगदीश गोरे । वडवणी
वडवणी तालुक्यातील चिंचवण, सोन्नाखोटा, रूई पिंपळ, चिखलबीड, पिंपळटक्का,यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात वडवणी तालुक्यात उसाचे क्षेत्रा आहे त्याच बरोबर मुग, कापूस,ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला  असून त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे म्हटले आहे की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला  त्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पंचनामे करण्यात यावेत व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा कष्टाने पिकवलेले तोंडाला घास आलेला आज जातोय. शेतामध्ये राब राब राबवून शेवटी काय परस्थिती त्यांच्यावर आहे.

आत्महत्या करायची वेळ आली आहे. लोखो रूपांयचे नुकसान झालेले आहे.. तातडीने महसूस विभागाने पंचनामे करून त्यांना नुकस्तानग्रस्त पिकांचे भरपाईचे आदेश काढावेत त्यामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे देखील दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे

2 comments:

  1. नुकसानभरपाई दिली पाहिजे.

    ReplyDelete
  2. नुकसानभरपाई दिली पाहिजे.

    ReplyDelete