Breaking News

गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, कला, साहित्य व संस्कृती विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
शेखर मोटे उपाध्यक्ष, अंकुश आतकरे प्रसिद्धीप्रमुख तर आनंद दाभाडे यांची शहराध्यक्षपदी निवड

गेवराई :  गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिका-यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सुचनेनूसार मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डाॅ. सुधिर निकम यांच्या आदेशाने बीड जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. संतोष वारे यांनी दि.१ सप्टेंबर रोजी नियुक्ती पत्र देवून गेवराई तालुक्यातील पदाधिका-यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गेवराई तालुक्याच्या कला क्षेत्रातील कलावंत, लोककलावंत यांचेसह सर्व कलाकारांना विविध शासकिय योजना, आरोग्य विमा कवच, अप्पती काळात शासनाकडून होणारी मदत आशा विविध योजनांचा लाभ कलावंतापर्यंत पोहचण्याच्या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग गेवराई तालुक्याच्या निवडी करण्यात आल्या.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या सुचनेनुसार मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डाॅ. सुधिर निकम यांच्या आदेशाने बीड जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. संतोष वारे यांनी दि. १ सप्टेंबर रोजी नियुक्ती पत्रे देवून या निवडी केल्या. यावेळी तालुका उपाध्यक्षपदी शेखर मोटे, सरचिटणीस पदी परमेश्वर शिंदे, समन्वयक पदी शरद सदाफुले, प्रसिद्धी प्रमुख पदी अंकुश आतकरे, शहराध्यक्षपदी आनंद दाभाडे, शहर सरचिटणीस पदी सुमेथ भोले, शहर समन्वयकपदी प्रमोद झेंडेकर यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.


या निवडीने नवनिर्वाचित पदाधिका-यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला असुन त्यांना पुढील कार्यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित,  जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऋषिकेश बेदरे, नगरसेवक राधेश्याम येवले, बंडूशेठ मोटे, संजय पुरणपोळे, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, संदिप मडके सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

No comments