Breaking News

बार्शी नाका पुलाचा प्रश्न आ विनायक मेटे हेच मार्गी लावू शकतात, स्थानिक लोकांची भावना


मोमीनपुरा येथील बिंदूसुरा नदीवरील पुलासाठी आ विनायक मेटे प्रयत्न करणार


बीड :  शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या बिंदूसुरा नदीवरील बार्शी नाका पूल आ विनायक मेटे यांच्या प्रयत्नांतून झाला होता. त्याप्रमाणेच मोमीनपुरा - खासबागला जोडणारा पुलदेखील आ विनायक मेटे हेच करू शकतात अशी भावना येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी स्थानिक लोकांनी जमत हि मागणी आ विनायक मेटे यांच्याकडे केली. यावेळी आ विनायक मेटे यांनी या ठिकाणची पाहणी करत आपण यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
  

मोमीनपुरा, इस्लामपुरा आदी भागातून नागरिकांना खासबागकडे येण्यासाठी बार्शी नाका किंवा सुभाष रोडच्या पुलाचा वापर करावा लागतो. यामुळे याचे अंतर अधिकचे पडते. मात्र मोमीनपुरा भागात जर पूल करण्यात आला तर या भागातील स्थानिक लोकांच्या सोयीचे होऊ शकते. हा प्रश्न क्षीरसागर कुटुंबीय नव्हे ते आ विनायक मेटेच मार्गी लावू शकतात अशी भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी या भागातील नागरिकांनी आ विनायक मेटे यांना निवेदन देखील दिले. शिवसंग्राम अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जाकेर हुसेन, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, इकबाल रेहमान, कुरेशी, अझर भाई, सलमान अली, समीर सरकार, शकील खान व या भागातील स्थानिक लोकांची उपस्थिती होती. 

No comments