Breaking News

भगवानगड शिक्षण प्रसारक मंडळ व मिसाळ परिवार नेहमीच पाठीशी - रमेश पोकळे


बीड : भगवानगड शिक्षण प्रसारक मंडळ व भगवान विद्या प्रसारक मंडळाच्या  वतीने भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.


भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी रमेशभाऊ पोकळे,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्षपदी सलीमभाई जहाँगीर व भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस पदी प्रा.डॉ.देवीदासजी नागरगोजे यांची निवड झाल्याबद्दल भगवानगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सचिव सत्यसेनजी मिसाळ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छोटेखानी सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की भगवानगड शिक्षण प्रसारक मंडळ व भगवान विद्या प्रसारक मंडळ तसेच मिसाळ परिवार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत किंवा सुखदुःखाच्या प्रसंगी हा परिवार नेहमीच आम्हाला पाठबळ देत आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब,महाराष्ट्राच्या नेत्या पंकजाताई मुंडे,खा.डॉ.प्रीतमताई मुंडे आणि आपल्या पारिवारिक संस्थेने टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गो.गो. मिसाळ सरांचे नेहमी मिळणारे मार्गदर्शन आणि पाठीवरील शाबासकीची थाप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देते असेही यावेळी ते म्हणाले.

यावेळी सलीमभाई जहाँगीर, प्रा.डॉ.देवीदासजी नागरगोजे, संस्थेचे सचिव सत्यसेनजी मिसाळ सर यांनी समयोचित मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी भाजयुमोचे माजी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रवीणजी पवार , मुख्याध्यापक सर्वश्री. बाळासाहेब सानप, चव्हाण सर,ए. डी. मिसाळ सर,भगवान शिक्षक पतसंस्थेचे सचिव वारे सर,सदस्य बाळासाहेब मिसाळ सर, शिक्षक, कर्मचारी सह आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढाकणे सरांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सांगळे सरांनी केले.

1 comment: