Breaking News

न्यायासाठी कुटूंबासह कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस ; प्रशासनाचे दुर्लक्ष


गौतम बचुटे । केज 
संस्था चालक आणि प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध केज तालुक्यातील पाथरा येथील बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील कर्मचारी आपल्या मुलांबाळासह गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र त्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून अद्याप अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांमध्ये सौ. उषा अमरसिंग कदम, सौ. नमिता संजय बनसोडे, सौ. छाया सतिश सातपुते, सौ. संध्या अमोल सोनवने, सौ. वदना संजय सोनवणे, सौ. सुनिता परमेश्वर कांबळे, सौ. शितल संभाजी कांबळे, संजय मारुती सोनवणे, परमेश्वर ईश्वर कांबळे आणि सार्थक संजय बनसोडे,  राजवीर संभाजी कांबळे उपोषणाला बसले आहेत. यात सात महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे..

No comments