Breaking News

ऐसी आम्हा लाभली माऊली...


वैराग्यमूर्ती वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी हा मानव देह सोडून गेले.

.!!आदर्श घ्यावा ऐसिच विरक्ती ! शास्ञ शुद्ध वास्तव शिकवण देती ! नतमस्तक व्हावे ऐशा गुरूमूर्ती !!तस्मै श्री गुरवे नमः !!

विश्वाच्या व मानवाच्या कल्याणासाठी इ.स.१९३७ पासून ते २०२०पर्यंत ८४ तपोनुष्ठान प.पु.गुरूमाऊलींनी कठोर तपश्चर्या व साधना करून केलेली आहेत.राष्ट्रसंत गुरूमाऊली जनकल्याणार्थ चंदनासम झिजले आहेत.शिवभजन व शिवकिर्तनाचे अभंगकर्ते संत शिरोमणी मन्मथ स्वामी हे प.पु.गुरूमाऊलींचे प्रेरणास्थान होते.अध्यात्म व विज्ञान यांची सांगड म्हणजेच राष्ट्रसंत गुरूमाऊली.अंधश्रद्धांना माऊलींचा प्रखर विरोध होता.
शिवाला सर्व प्राणीमाञ समान व सारखेच असून शिवाची भक्ती, उपासना, पुजा अर्चा करण्याचा सर्वांनाच समान अधिकार असल्याचे ते सांगतात .ते अध्यात्मिक क्षेञातही सर्वानाच समतेची व समान हक्काची जाणीव करून देऊन भेदाभेद न करण्याची शिकवण आप्पानी दिली. विज्ञान,अध्यात्म,धर्म,संस्कृती यांचा सुरेख संगम असलेले आत्मविजयी व स्थितप्रज्ञ राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेञातीलअधिकारी संत होते माऊलींचे आचार विचार आकाशाइतके उंचीचे असून आपणा सर्वाच्या मानवाच्या कल्याणासाठी ,ध्येयप्राप्तीसाठी माऊलींनी खूप साधना केली होती. त्यांचा त्याग, विरक्ती,निस्पृहता,  तपस्या,साधना, आकाशाला गवसणी घालणारे असेच माऊलींचे देवभक्ती व देशभक्ती युक्त असे महान कार्ये होते.माऊलींचे तत्व विश्वाला व्यापून असेच आहे . राष्ट्रसंत देवासारखे आहेत असे नसून ,देवच राष्ट्रसंत गुरूमाऊलीसारखा आहे.देव कसा आहे हे पाहावयाचे असेल तर राष्ट्रसंताकडे पाहावे म्हणजे समजेल.राष्ट्रसंत हे शुचिता,समता, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता,शिक्षण व विशेषतः विज्ञाननिष्ठ शिक्षण यांचे पुरस्कर्ते होते. मानवतावादी राष्ट्रसंताने मानवता धर्म ,जातपंथ,स्ञी पुरूष,राव रंक,अशा भेदाच्या सर्व सीमा पार करून रंजल्या गांजलेल्यांना आपले मानून त्याना मदत करत राहणे अशी मानवधर्माची शिकवण माऊलींनी दिली.अशी वैराग्यमुर्ती गुरूमाऊली आपल्या सर्वांना पोरकं करून आज आपल्यातून निघून गेले आहेत. अशा या गुरूमाऊली चरणी श्री सचिन शहागडकरसह शिष्यगणाचा शत:नमन तथा सांष्टाग दंडवत.

!! जे वेदशास्ञ संपन्न ! जे स्वानुभवी सर्वज्ञ!जे निजानंदी निमग्न!! निर्विकल्प ते !! उपैति लोकविख्यातं,लोभ मोह विवर्जितं !!तस्मै श्री गुरवे नमः !!

शिष्य
श्री सचिन शंकरराव शहागडकर
संस्थापक अध्यक्ष -
शिवस्वराज सामाजिक प्रतिष्ठाण बीड,महाराष्ट्र.

No comments