Breaking News

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परीसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

बीड : शैक्षणिक  वर्ष 2020-21 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2020 परीक्षा बीड शहरातील एकुण 02 परीक्षा केंद्रामध्ये दि.01 ऑक्टोबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत दोन क्षेत्रात घेण्याचे निश्चित झाल्याचे कळविलेले आहे.

सदर परीक्षेच्या वेळी परीक्षार्थीसोबत त्यांचे नातेवाईक, मित्र व हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परिसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असे प्रसंग उद्भवल्यास केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पाडणे अडचणीचे होईल.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2020 परीक्षा ही बीड शहरात दि. 01 ऑक्टोबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत दोन क्षेत्रात यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्नीक कॉलेज, बार्शी रोड, बीड व गव्हरमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज पिंपळनेर रोड, बीड या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

उक्त परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यव्यस्था आबाधित रहावी व अनधिकृत कृत्ये होऊ नये या करीता फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केंद्राच्या 100 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, परिक्षार्थी यांचे व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परीसरात फोटोकॉपी, ई-मेल,इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश, कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेसट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास तसेच झेरॉक्स,एस.टी.डी. मशीन चालू ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे असे नामदेव टिळेकर, उपविभागीय अधिकारी,बीड यांनी कळविले आहे.


No comments