Breaking News

मंडप व्यावसायिकांना आर्थिक मदत देवुन व्यवसायाला परवानगी द्या

मंडपवाल्यांचं तहसीलदारांना निवेदन



गौतम बचुटे । केज 

लॉक डाउन मुळे सर्व व्यवसाय आणि कार्यक्रम बंद असल्याने मंडप व्यावसायिक आणि कामगारांची उपासमार होत असल्याने त्यांना शासनाने आर्थिक मदत करून व्यवसायास परवानगी देण्याची मागणी केज येथील मंडप व्यावसायिकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  तसेच यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोपोषन करण्यात येणार आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या सर्वत्र लॉक डॉऊनमुळे कार्यक्रमास परवानगी नाही. त्यामुळे मंडप व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले रोजंदारी कामगार यांची व त्यांच्या कुटुंबाची प्रचंड प्रमाणात उपासमार सुरू आहे. या मुळे मंडप व्यावसायिक आणि मंडपाचे काम करणारे मजूर यांना शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिल्यास मंडप व मजुरांच्या हाताला काम मिळेल. अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच या मागणी संदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास दि.६ ऑक्टोबर रोजी ११:३० वाजता केज तालुक्यातील सर्व मंडप व्यावसायिक आणि मजूर हे रक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. निवेदनाची प्रत पोलीस स्टेशनलाही दिली आहे. निवेदनावर अध्यक्ष आजम तांबोळी, भाऊसाहेब राऊत, अरुण हजारे, संजय राऊत, सचिन कावळे, भैय्या जाधव, पिंटू घुले, नामदेव हजारे, प्रेम गायकवाड यांच्या सह्या आहेत.


No comments