Breaking News

अँटीजेन टेस्ट न करणाऱ्यांवर होणार कारवाई - तहसीलदार सानप

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर, का. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या वेळेत आपली अँटीजेन टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन नायब तहसीलदार तथा नगर पंचायतचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केलं असून अँटीजेन तपासणीस टाळाटाळ किंवा न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार शिरुर कासार शहरात Rapid Antigen test अभियान स्वरूपात राबवण्यात येत आहे. शहरातील सर्व व्यापारी किरकोळ भाजी- फळ विक्रेते, दुधवाले, खाजगी बँक कर्मचारी, किराणा दुकानदार यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.  दरम्यान ज्यांची नावे नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे नोंद करण्यात आलेली नाहीत. अशा व्यापारी बांधवांनी आपलं नाव नगरपंचायतमध्ये उद्या शुक्रवारी (दि.११) रोजी नोंद करावीत. जे व्यापारी बांधव अँटीजेन टेस्ट करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याची खबरदारी व्यापारी बंधूनी घ्यावी असे आवाहन ही  नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.

No comments