Breaking News

रानभाजी महोत्सव उत्साहात


गौतम बचुटे । केज 
जागतीक आदिवासी दिनाच्या निमित्ताने केज येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राणभाजी महोत्सव संपन्न झाला.
या बाबतची महिती अशी की, दि. ७ सप्टेंबर रोजी जागतिक आदिवासी दिना निमित्त केज येथे रान भाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव घेण्यात आला. यात शेतामध्ये नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या; त्यांचे आरोग्य विषयीचे फायदे हे सर्वांना माहीत व्हावेत तसेच शेतकऱ्यांना आणि शेतकरी गटांना त्याच्या विक्रीतून लाभ मिळावा. या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या २५ रानभाज्या त्यामध्ये प्रामुख्याने अंबाडी, हादगा, शेवगा, अळू, पाथरी, कपळफोडी, कुर्डू, तांदुळजा व इतर रानभाज्या आणि त्यांचे औषधी गुणधर्म यांची माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात आली.  या कार्यक्रमाचे उदघाटन  नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, तालुका कृषी अधिकारी शेळके, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ एन. ए. जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, जगजीवन पी. डी. व्ही. बी. अंभोरे, श्रीमती व्ही. आर. घुले, श्रीमती व्ही. व्ही. कदम हे मंडळ कृषी अधिकारी, सर्व शेतकरी गटातील सदस्य, सर्व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील  आणि आभार प्रदर्शन बी. एस. सूर्यवंशी यांनी  केले.

No comments