Breaking News

ओम घुलेंच्या ट्रान्सप्लान्ट ऑपरेशनसाठी मदतीचे आवाहन


बीड : पोटातील लहान आतडी पूर्णत: खराब झाल्यामुळे ट्रान्सप्लान्ट या मोठी शस्त्रक्रियेसाठी दहा वर्षाच्या ओम संतोष घुले या बालकांच्या जीवन जगण्यासाठीच्या प्रयत्नासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
ओम संतोष घुले (10 वर्षे) यांच्या पोटातील लहान आतडी खराब झाल्यामुळे पनवेल येथील साई चाईल्ड केअर सेंटर मध्ये दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी शस्त्रक्रिया करून आतडी काढून टाकण्यात आली आहेत. साई हॉस्पिटल पनवेल आणि ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत 8 लक्ष रु खर्च झाला आहे आणि अजुन 25 लक्ष रु खर्च होणार आहे.
ओमच्या जगण्याचा शेवटचा मार्ग म्हणून फक्त ल   हान आतडी 1 मीटर पर्यन्त ट्रान्सप्लान्ट करूनच  जोडण्यात येणार आहे.  सदरील शस्त्रक्रिया पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होणार आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी 25 लक्ष रूपये खर्च येणार आहे.  आयएफएसई कोड एसबीआयएन 0007795 अकाऊंंंंट नंबर  31438897058,  भारतीय स्टेट बँक, शाखा महाड असा आहे. दानशुर व्यक्ती, सेवाभावी संस्थेचे विश्‍वस्त यांनी डोनेशन देवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

No comments