Breaking News

भूसंपादना अभावी रखडलेल्या पैठण ते पंढरपूर पालखी महामार्गाचा मार्ग मोकळा


तालुक्‍यातील नऊ गावातील जमीन होणार संपादित

प्रशासकीय पातळीवरून भूसंपादनाच्या कार्यवाहीला वेग


शिरूर कासार  : पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाची अवस्था बिकट असल्याने प्रशासनाकडून या राज्य महामार्गाला मंजुरी प्राप्त झाली व 752 ई क्रमांकाचा राज्य महामार्ग प्रारंभ करण्यात आला होता परंतु शिरूर कासार तालुक्यांमध्ये या महामार्गाचे काम मावेजा अभावी शेतकऱ्यांनी खंडित केले होते शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून भूसंपादन व राज्य महामार्ग विभाग यांच्यामार्फत हा प्रश्न सध्या मार्गी लावला जाणार आहे यामुळे खंड पडलेल्या महामार्गाच्या कामाला पुन्हा जोमाने प्रारंभ होणार आहे.


पैठण पंढरपूर या पालखी मार्गाचे काम शेत जमिनीचा मावेजा प्राप्त न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडित केले होते मागील वर्षांमध्ये या रस्त्याच्या कामाचा वेग मंद झाला होता परंतु उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग बीड यांच्या कार्याने या महामार्गावरील तालुक्यातील 9 गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीला वेग दिला जाणार असून या दरम्यान भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही खाजगी व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये असे प्रशासकीय विभागाकडून सांगण्यात आलेले आहे या महामार्गाचे भूसंपादन थेट खरेदी पद्धतीने होणार असल्याने काही अडचन किंवा तक्रार असल्यास कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद  म्हणजेच उपजिल्हाधिकारी भुसं. ल.पा.बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (भूसं)  बीड यांनी केले आहे.

तालुक्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग.

माजी आ. भीमराव धोंडे व तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमधून पैठण पंढरपूर या पालखी मार्गाला सातशे कोटी रुपये निधीची मंजुरी मिळवली होती तर तालुक्यात एकही महामार्ग नसल्याने हा तालुक्यातील पहिला महामार्ग ठरलेला असून मावेजा अभावी या महामार्गाचे काम रखडले होते.

शेतजमिनीच्या मावेजासाठी आ. बाळासाहेब आजबे यांचा पाठपुरावा
शेत जमिनीचा मावेजा प्राप्त होत नसल्याने तालुक्यातील नऊ गावातील शेतकर्यांनी या महामार्गाचे काम केलेलेहोते या शेतकर्‍यांना शेत जमिनीचा मावेजा प्राप्त व्हावा यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला असल्याने शेतकऱ्यांना मावेजा प्राप्त होत असल्याचे बोलले जात आहे.

हे आहेत तालुक्यातील गावे.
शिरूर कासार तालुक्‍यातील घोगस पारगाव, माळेगाव चकला, उखंडा चकला, दहिवंडी, शिरूर कासार,  राक्षिसभवन व खोल्याचीवाडी या गावातील शेत जमिनीचे भूसंपादन विभागामार्फत केले जाणार आहे.

No comments