Breaking News

आयपीएलमध्ये शिरूरच्या प्रणवने मारली बाजी !


आयपीएलच्या ऑनलाईन क्रिकेटच्या माध्यमातून जिंकले  पावणे दोन लाख रुपये

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरुर कासार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा सध्या प्रेक्षकांशिवाय पहायला मिळत आहे. प्रेक्षकांची मैदानावर जरी या खेळाला पाहण्यासाठी गर्दी होत नसली तरी देखील घरबसल्या आयपीएल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मात्र कमी नसल्याचे दिसत आहे.आयपीएल म्हणजे खेळाडूंसाठी आर्थिक दृष्ट्या चांदी करून देणारी स्पर्धा. तशीच चांदी घरबसल्या खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील या निमित्ताने उपलब्ध होत आहे. ऍपच्या माध्यमातून आयपीएल मध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतियोगीता होत आहेत त्या मध्ये सहभागी होऊन घरबसल्या पैसे कमविण्याची नामी संधी या खेळाने उपलब्ध करून दिली आहे. अशाच एका प्रतियोगीता मध्ये सहभागी झालेल्या शहरातील एका उच्चशिक्षित तरुणाला पावणे दोन लाख रुपये आणि सॅमसंग कंपनीचा स्मार्ट मोबाईल मिळाला आहे. विशेष म्हणजे सामना संपल्यावर सदरील रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा संदेश देखील त्याला आला.

 21 तारखेला  सायंकाळी साडेसात वाजता सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंज बँगलोर यांच्यात ट्वेंटी ट्वेंटी चा सामना खेळविण्यात आला. दोन संघात मिळून एकूण 22 खेळाडू या सामन्यात सहभागी झाले होते. माय इलेव्हन सर्कल या ऍपच्या माध्यमातून दोन संघातील मिळून अकरा खेळाडूंचा एक संघ तयार करायचा असतो. विशेष म्हणजे हा संघ तयार करताना उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूचा समतोल राखून हा संघ निश्चित करायचा असतो. ज्या खेळाडूंची आपण निवड केली आहे त्या खेळाडूंनी आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करायची असते.त्या खेळाडुच्या कामगिरीवर प्रतियोगीता मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला पॉईंट अर्थात गुण मिळत असतात.

येथील प्रणव मंगरुळकर या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने या खेळात सहभाग घेऊन माय इलेव्हन सर्कलची निवड केली. ज्या मध्ये कर्णधार म्हणून जॉनी बेअरस्टो आणि उपकर्णधार म्हणून ए.बी.डेव्हीलीयरची निवड केली. तर उर्वरित संघात फलंदाज म्हणून मनीष पांडे,अरॉन फिंच,विराट कोहली,देवदत्त पडीकल,डेव्हिड वॉर्नर आणि ए.बी.डेव्हीलीयर यांची तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यजुवेन्द्र चहल, रशिद खान, नवदीप सैनी यांची निवड केली. अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवम दुबेला संघात घेऊन एक चांगला संघ निवडला. विशेष म्हणजे निवड केलेल्या सर्व खेळाडूंनी या सामन्यात आपल्या संघासाठी दमदार कामगिरी बजावली. त्यामुळे प्रवीणला प्रतियोगीता मध्ये 360.25 एवढे चांगले पॉईंट देखील मिळाले. या पॉईंटच्या आधारे पहिल्या प्रतियोगीता मध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये आणि सॅमसंग कंपनीचा स्मार्ट मोबाईल आणि दुसऱ्या प्रतियोगीता मध्ये चौरेचाळीस हजार रुपये असे एकूण एक लाख एकोनसत्तर हजार रुपये जिंकले. प्रणवने घरबसल्या जिंकलेल्या रकमेबद्दल त्याचे विविध स्तरातुन अभिनंदन होत असून मोबाईलचा अशा सकारात्मक कामासाठी विनियोग व्हावा हा संदेश या निमित्ताने तरुणाईला मिळाला आहे.

दमदार कामगिरी केली तर पॉईंट प्रमाणे स्पर्धक विजेता होतो!

सौरव गांगुली,शेन वॉटसन,रशीद खान हे माय 11 सर्कल या ऍपची जाहिरात करत असून खेळात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट खेळाडूंची निवड करायची आहे.आपण निवडलेल्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली तर पॉईंट प्रमाणे स्पर्धक विजेता होत असतो.

आपल्या जवळील पैशांचा अपव्यय करू नये!

गत तीन वर्षांपासून मी या स्पर्धेत सहभागी होत आहे. संघ, मैदान आणि कामगिरी करणारे संभाव्य खेळाडू यांच्यावर हा खेळ अवलंबून आहे. स्पर्धेत सहभागी होताना स्पर्धकाने सर्व अभ्यास करूनच उतरावे अन्यथा आपल्या जवळील पैशांचा अपव्यय करू नये. अस प्रणव मंगरूळकर विजेता स्पर्धक आयपीएल काँटेस्ट म्हणाला. 

No comments