Breaking News

रायमोह परिसरातील गावे शिरूर पोलीस स्टेशनला जोडावेत- गोकुळ सानप यांची मागणी


रायमोहा :
  शिरूर कासार तालुक्‍यात असलेले रायमोह आणि रायमोह परिसरातील गावे आणि वाड्या यांना पाटोदा पोलीस स्टेशन आहे. रायमोहा ते पाटोदा हे अंतर 28 किलोमीटर असून रायमोह ते शिरूर कासार हे अंतर फक्त अकरा किलोमीटर आहे. पाटोदा पोलीस स्टेशन हे या परिसरातील नागरिकांना अनेक दृष्टीने अडचणीचे ठरत असून ही सर्व गावे शिरूर कासार पोलीस स्टेशनला जोडावीत. अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

रायमोह आणि परिसरातील वाड्या आणि गावांना दळणवळणाच्या दृष्टीने शिरूर कासार हे सोयीचे आहे. या सर्व गावांना तहसील कोर्ट आणि इतर कामांसाठी शिरूर कासार ला जावे लागते तर फक्त पोलिस स्टेशनचे काम असेल तरच जास्त अंतर कापून पाटोदाला जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून ही सर्व गावे पाटोदा पोलीस स्टेशन ऐवजी शिरूर कासार पोलीस स्टेशनला जोडावेत. अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. सर्जेराव तात्या तांदळे यांचे व भाजपाचे निष्ठावान गोकुळ सानप हे गेल्या पाच वर्षापासून याबाबत मागणी करत आहेत. परिसरातील नागरिकांनाही सोयीच्या दृष्टीने ही मागणी रास्त वाटते. मात्र या प्रश्नाकडे अद्याप पर्यंत संबंधितांनी लक्ष घातलेले नाही.




No comments