Breaking News

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक विरोधात शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

पिक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार   

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना बँक शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करत तात्काळ पीक कर्ज वाटप करून देण्याची मागणी केली आहे. 
 गेल्या चार महिन्यांपासून दिंद्रुड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री कानडे हे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत शेतकऱ्यांनी ग्रामीण  बँकेच्या वारंवार चकरा मारूनही नवीन पीक कर्ज न मिळाल्याने व शेती मशागत करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नवीन पीक कर्ज  न मिळाल्यास येत्या दिनांक 14 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शाखा व्यवस्थापकाच्या विरोधात कारवाई करेपर्यंत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर नारायण चांदबोधले,दिलीप कोमटवार,अतुल चव्हाण, अखील सय्यद,ज्ञानेश्वर आरणकल्ले, राजाभाऊ कटारे आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

No comments