Breaking News

माजलगाव धरणातून शेतीला पाणी सोडा - भाजपा नेते रमेश आडसकर


जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलं निवेदन

जगदीश गोरे । धारूर

भर पावसाळ्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाच्या पिकासह उसाचे पीक अडचणीत आले आहे. माजलगाव आणि कुंडलिका धरण भरले आहे. शिवाय जायकवाडी पैठण कालव्यातून पाणी धरणात सोडले आहे .त्यामुळे तात्काळ माजलगाव धरणातून पाणी सोडावे अशी मागणी भाजपाचे नेते रमेश आडसकर यांनी केली असून जिल्हाधिकारी बीड यांच्यासोबत दूरध्वनीवर संपर्क पण साधला .जर पाणी सोडले तरच पिके वाचतील अन्यथा चांगला पाऊस काळ असून सुद्धा ताणाच्या काळात पिके धोक्‍यात येऊ शकतात? अस त्यांनी म्हटले आहे . 

          प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आडसकर यांनी म्हटले आहे की   . यावर्षी पाऊस काळ चांगला आहे. बीड जिल्ह्यातील सारी धरणं भरली, माजलगावच धरण सुद्धा 80 टक्‍क्‍यांपर्यंत भरल आहे. तर कुंडलिका धरण 100 टक्के भरलं. याशिवाय पैठण जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल असून कालव्याद्वारे माजलगावच्या धरणात 500 क्‍यूसेस पाणी सुरू झालेल आहे. वर्तमान परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तापमान वाढत असून कडक पडलेल्या उन्हामुळे सोयाबीन, कापूस तूर या पिकासह उसाचे पीक धोक्यात येऊ लागले आहे.? सध्या तात्काळ पावसाची गरज असून माजलगावच्या कॅनाल खाली जवळपास 15000 हेक्टरपेक्षा अधिक  उसाचे उत्पादन आहे. कुंडलिका कॅनॉल मधून सुद्धा वडवणी आणि आणि धारूर तालुक्यातील काही  शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. माजलगाव धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी उस उत्पादक शेतकऱ्यांसह खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे. या कॅनल द्वारे पाणी सोडलं तर परळी, माजलगाव, सोनपेठ, गंगाखेड, आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. अजून पावसाने दडी मारली तर, चांगला पाऊस काळ असून सुद्धा पदरात काही पडणार नाही.?  सोयाबीन कापूस पिके सुकू लागली आहेत, तर उसाचे फड पाण्या अभावी सुकून जात आहेत .  जिल्हाधिकारी श्री रेखावार यांच्यासमोर कोरोना सारख्या संकटाचा सामना असला तरी? काळाची गरज म्हणून त्यांनी पाटबंधारे खात्याला तात्काळ सूचना देऊन भरलेल्या धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सोडण्याचे आदेश द्यावे, अशा प्रकारची मागणी रमेश आडकरांनी केली आहे .

No comments