Breaking News

केंद्रेकरांनी बीडच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन केली पॉझिटिव्ह रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस


उपचाराबाबत केली चौकशी, उपचार घेणाऱ्या रूग्णांनी व्यक्त केल्या भावना

बीड : मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज कोरोना वरील उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी बीड जिल्ह्यात भेट दिली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील covid-19 उपचार केंद्रात दाखल रुग्णांची थेट भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार होते.


यावेळी कोवीड वॉर्डात दाखल वयोवृद्ध रुग्णांनी त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांबाबत समाधान व्यक्त करताना येथील भोजन सुविधा चांगल्या असल्याचे सांगितले यावेळी शासन आणि प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांसाठी दुवा दिल्या.

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा "थेट आखो देखा हाल" विभागीय आयुक्तांनी श्री केंद्रेकर यांनी यावेळी जाणून घेतला याप्रसंगी त्यांच्या समवेत  सर्व  प्रमुख अधिकाऱ्यांनी  पीपीई किट घालून कोरोना वार्डातील सुविधांची पाहणी केली.

No comments