Breaking News

सराईत ११ गुंड दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार..!


बीड : समाजविघातक प्रवृत्तीना शहरातून हद्दपार करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कायद्यातील नियमांनुसार सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम हाती घेतली आहे.  विविध गुन्ह्यातील ११ कुख्यात गुंडांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 


बीडसह जिल्ह्यात दरोडा, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हाणामारी करून जनतेत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचे प्रमाण जिल्ह्यात वाढले होते. वाढती गुन्हेगारी त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा नेहमीच प्रश्न उदभवत असल्यानं जनता ही त्रस्त झाली होती. बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी आणि गुंडांचे समूळ उच्चाटन करण्याचा दृष्टीकोन ठेवून वेगवेगळ्या कायद्यांर्गत गुन्हेगारांवर आणि गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनचं श्री. पोद्दार यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला महाराष्ट्र पोलीस कायदा 56 प्रमाणे जास्तीत जास्त हद्दपारीचे प्रस्ताव उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आपल्या यंत्रणेला आदेशीत केले होते. बीड विभागातून पाठविण्यात आलेल्या पैकी बीड शहर, शिवाजीनगर, पिंपळनेर तर गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यातील ११ प्रस्तावांमधील गुंडांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. 
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार

यामध्ये बीड शहरातील सोहेलखान समदखान पठाण (रा. जुनी भाजी मंडई),  अनुप गायकवाड (रा. बारादरी, माळीवेस), अजय राजु जाधव (रा. पातरुड गल्ली), अभिजित उर्फ आबाड्या अशोक मस्कर (रा. कब्बाड गल्ली), शेख जुबेर अब्दुल रहेमान (रा. मसरत नगर), जुबेरखान समदखान (रा. बुंदेलपुरा), राध्येशाम उर्फ राधाकिसन बन्सी आमटे (रा. खांडे पारगाव, ह. मु. पालवन चौक), आमेरखान अकबरखान (रा. इस्लामपुरा), लखन किसन तुसांबड (रा. वतारवेस), शाम दशरथ वाघामारे (रा. कुकडगाव), किरण बाबुराव नाटकर (रा. राक्षस भुवन, ता. गेवराई) अशा एकूण ११ समाजविघातक  गुंड प्रवृतीच्या आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, गेवराईचे उप विभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि भारत राऊत, पोनि सुनील बिर्ला, सपोनि गजानन जाधव, सपोनि शरद भुतेकर, सपोनि विजय देशमुख यांनी केली. 

1 comment: