Breaking News

तरुणांना नोकरी द्या अथवा तीन हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा - राजेंद्र आमटे


सुशिक्षित  तरुणानं साठी शिवसंग्राम तीव्र आंदोलन करणार 

बीड : करोनाच्या पार्शभूमीवर अनेक सुशिक्षित तरुनांनी मोठ्या शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर करावे लागले   .शहरात चांगल्या ठिकाणी नोकरीला असणारे तरुण करोनमुळे नोकरी सोडून गावी आले परंतु ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक तरुणांवर उपासमारीची वेळ अली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना सरकार नोकऱ्या उपलब्ध करून देईल अशी अशा असताना सरकार फकत सुशिक्षित बेरोजगाराकडे  बघ्याची भूमिका घेत आहे.सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ म्हणणारे सरकार आज सुशिक्षित तरुण नोकरी साठी वणवण भटकत असताना सरकार शांत का?
                       सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे   सरकारने तात्काळ नोकर भरती करण्यात यावी,बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा  अन्यथा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ३००० रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या वतीने मा.आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसंग्राम विद्याथी आघाडीच्या वतीने विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे ,सरचिटणीस प्रशांत डोरले ,रवी हातांगळे, हर्षल वानखेडे मुकुंद गुंडेल्वार आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले    

2 comments:

  1. नौकरीवरून काढुण टाकणार सरकार नौकरी देईल का?

    ReplyDelete
  2. नौकरीवरून काढुण टाकणार सरकार नौकरी देईल का?

    ReplyDelete