Breaking News

आमदार संदीपभैय्या यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार - अजय सुरवसे

बीड : जिल्ह्यात यंदा समाधानकारकर पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बळीराजाने खरिपाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने खरीप पिकांचे नुकसान झालं असून काही ठिकाणी पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी केलं असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आमदार संदीपभैय्या यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 

बीड जिल्ह्यात गेल्या पाच सहा वर्षांपासून कायम दुष्काळ पडलेला होता. यंदा मात्र पावसानं चांगली हजेरी लावली. त्यामुळं शेतकऱ्यांसह सामान्य जनता आनंदीत झाली आहे. परंतू, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊस, बाजरी, ज्वारी आदी खरीप पिकांचं नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात न आल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मात्र बीड मतदार संघासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खचून न जाता महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनातील असलेलं सरकार आहे.  
बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी आपण आमदार  संदीपभैय्या यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचं अजय सुरवसे यांनी म्हटलं आहे.

No comments