Breaking News

टँकरचा अपघातात चालक ठारबीड : भरधाव वेगात निघालेल्या सिमेंट टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना कोळवाडी नजीक आज घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार मांजरसुंबाहुन बीड शहराकडे भरधाव वेगानं टँकर ( के. ए. ३२- डी, ७६७२) आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येत होता. दरम्यान कोळवाडी नजीक येताच चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये चालकाचा जागीचं मृत्यू झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, चालकाचं अर्ध शरीर टँकर बाहेर पडले होते तर शरीराचा अर्धा भाग टँकरमध्ये अडकला होता. माहिती मिळताच महामार्ग पोलीस पीएसआय गित्ते, अल्ताफ शेख, सुदाम वणवे, विजय जाधवर, विलास ठोंबरे, मारुती म्हेत्रे, श्री. सांगळे, श्री. बिक्कड घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बीडच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. 

No comments