Breaking News

सर्व कलावंतांनी सावध राहा व काळजी घ्या - अध्यक्ष मेघराज राजे भोसले


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार


संपूर्ण देशासह राज्यात पाहातो आहे की, कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे. माझ्या माहितीतले ८/१० कलावंतांचा बळी त्यात गेलेला आहे. सर्वसामान्य सभासदांची कामे रखडू नयेत म्हणूनच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सर्व कार्यालये आपण चालू ठेवली आहेत.

आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, तुमच्या व आपल्या कार्यालयातील सभासदांच्या सुरक्षिततेसाठी शक्यतो आपण महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येण्याचे टाळा. आपली सर्व कामे ही मेलद्वारे करुन देण्यात येतील. तसेच सर्व कलावंतांनी सावध राहा व काळजी घ्या, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच सर्व पदाधिकारी व संचालक यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments