Breaking News

आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते मेहकरीत जलपूजन


के. के. निकाळजे । आष्टी
आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे मेहकरी धरण यावर्षी सीना- मेहेकरी उपसा योजनेतून भरल्यानंतर आज रविवारी (दि.6 ) आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकरनाना यांच्या हस्ते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साध्या पद्धतीने जलपूजन करण्यात आले.

      
सीना धरण हे यावर्षी लवकर भरले असल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांनी या धरणातील जास्तीचे पाणी मेहेकरी धरण्यात आणण्यासाठी प्रयत्न करून मेहेकरी धरणही सीना मेहकरी उपसा योजनेतून भरून घेतले, गेल्या पंचवीस दिवसापासून सीना धरणातून 730 तासांमध्ये 430 mcft पाणी मेहकरी धरणात  सोडण्यात आले आहे, त्यामुळे मेहकरी धरणही यावर्षी पाऊस नसतानाही  शंभर टक्के भरले आहे, यापुढेही गरज भासल्यास सीना धरणातून पाणी  घेण्यात येईल तसे पत्रही आपण शासन दरबारी दिले असून मेहेकरी धरणाच्या दोन्ही कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले ,हे धरण भरल्यामुळे आसपासच्या वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार असल्याने या परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एवढेच नव्हे तर आष्टी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे ,कोरणा आजाराच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम छोट्या खानी घेण्यात आला असून सोशल डिस्टंसिंग पाळत पूजा व जलपूजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते, व शेतकरी उपस्थित होते.

No comments