Breaking News

साळेगावच्या शंकर विद्यालय परिसरात अंधाराचे साम्राज्य !

अबालवृद्धांना रात्री चालणं झालं मुश्किल; पथदिवे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील साळेगाव येथील शंकर विद्यालयाच्या परिसरात पथदिवे नसल्यानं याठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी ये-जा करताना अबालवृद्धांना येथून चालणं मुश्किल झाले आहे. यामुळं या परिसरात पथदिवे बसविण्यात यावेत. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


केज तालुक्यातील साळेगाव येथील महामार्गालगत छत्रपती शिक्षण संस्थेचे शंकर विद्यालय परिसरातील लोकवस्तीत ग्राम पंचायत दिवाबत्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या शाळेच्या प्रांगणात हायमास्ट पथदिवे बसविण्याची मागणी ग्रामपंचायतकडे अनेक वेळा करण्यात आलेली आहे. मात्र ग्रामपंचायतीचे कारभारी त्याकडं कानाडोळा करत असल्याने या रस्त्यावरून अबालवृद्धांना चालणे ही मुश्किल झालं आहे. त्यातच भुरट्या चोरांचा ही परिसरात सुळसुळाट निर्माण झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या परिसरात पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे. 

लोक वर्गणी करू..! 
शंकर विद्यालयाच्या परिसरात पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत कडे वारंवार करण्यात आलेली आहे. परंतु नेहमीच ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केलं आहे. ग्रामपंचायत या ठिकाणी पथदिव्यांसाठी निधी उपलब्ध करून बसवू शकत नसेल तर आम्ही लोक वर्गणी करून या परिसरात पथदिव्यांची व्यवस्था करून बसवू अशी प्रतिक्रिया राजकुमार गित्ते यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

No comments