Breaking News

उद्योजक महेश सावंत यांची दिव्यांग व्यवसाईकास अशीही मदत


के. के. निकाळजे । आष्टी

        आ. सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक महेश सावंत यांनी आपल्या आंबेडकर चौकातील जागेत स्वखर्चाने  सेड उभारून आष्टीशहरातील दिव्यांग राजू देशमुख यास मोबाईल गॅलरी  व शेख शकील हा गॅरेज चालक या  दोन्ही व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचे भाडे न घेता व्यवसाय सुरू करण्यास  मदत केली आहे. 

     आंबेडकर चौकातील या गाळे धारकांना पर्यायी जागा उपलब्ध होई पर्यंत व या गरिब व्यवसाईकांवर उपासमारीची वेळ येऊ नये त्यांचे दुकान सुरू राहावे , आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक महेश सावंत यांनी आपल्या स्वतःच्या जागेमध्ये शेड उभारून या दोन गरीब व होतकरू व्यावसायिकांना कुठलेही भाडे न घेता व्यवसायासाठी ही जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचे व्यापारी व व्यवसायईका मधून कौतुक केले जात आहे, उद्योजक महेश सावंत हे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सामाजिक कार्य  करत असतात त्यामुळे आमदार सुरेश आण्णा धस  यांच्या सांगण्यावरून उद्योजक महेश सावंत हे लगेच या व्यवसाय चालकांच्या मदतीला धावून आले व स्वखर्चाने हा व्यवसाय उभारण्यास त्यांना मदत केली आहे.

No comments