Breaking News

आमदार सुरेश धस यांची शिरुर शहरात सरप्राईज मॉर्निंग व्हिजिट


विकास कामांचा घेतला आढावा तर अपूर्ण कामावरून पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर  केली कानउघडणी

शिरुर कासार : शिरूर शहरात उठ सुठ सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करणाऱ्या आणि आमदार धसांचे शिलेदार म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवकांना आमदार सुरेश धस यांनी आपल्या खुमासदार शैलीत रविवारच्या सकाळी चांगलेच झापले आहे.

भल्या पहाटे येऊन आमदार सुरेश धस यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.या वेळी शहरातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरकुलांच्या आणि इतर विकासकामांच्या मुद्द्यावरून आमदार धस यांनी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक शिलेदारांची चांगलीच कानउघडणी केली आहे. निवडून आलेले सतरा आणि स्वीकृत म्हणून दोन अशी एकोणीस सदस्य संख्या असलेली नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे.
तत्कालीन सरकारच्या काळात शहराच्या विकासासाठी जवळपास साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजुर करून आणण्याचे काम आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
मात्र ज्या विकासकामांसाठी हा निधी दिला होता ती सर्व कामे अर्धवट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार धस चांगलेच संतापले.नगराध्यक्ष,
उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा एकामागून एक नंबर लावत नगरपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत त्यांनी एका तासाची चांगलीच शिकवणी घेतली.
बैठकीस उशिरा आलेल्या नगरसेवकांना तर तुमची पूजा करून पाया पडतो असा उपहासात्मक टोला लगावला.
नगरसेवकांच्या प्रभागातील प्रधानमंत्री घरकुल आणि रमाई आवास योजनेतील कामे कशामुळे प्रलंबित आहेत?
का होत नाहीत?अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत येत्या आठवडाभरात अर्धवट असलेली कामे मार्गी लावण्याचा सज्जड दम देखील भरला.

सायकलस्वारी टाळली
आमदार सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा शहरात जसा सायकलवर फेरफटका मारला तसा शिरुर शहरात टाळला. नगरपंचायतच्या वतीने  सायकल पुढे केल्यानंतर आमदार धस यांनी कामेच पूर्ण नाहीत तर पाहणी तरी कशाची करायची?असा प्रतिप्रश्न करत सायकलस्वारी टाळली.


फॉलोअपने तर सगळे वाटोळे केले
घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत कशामुळे आहेत?असा प्रश्न आ.धस यांनी केल्यानंतर शहराला 'प्रकाश'वाट दाखविणाऱ्या पदाधिकाऱ्याने सदरील कामांचा फॉलोअप सुरू असल्याचे उत्तर दिले.या वेळी आ.धस यांनी फॉलोअपने तर सगळे वाटोळे केले असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.


तर माझ्या बँकेतील पैशांनी कामे करा

शहरातील ज्या लोकांची घरकुलांची कामे आर्थिक अडचणींमुळे थांबलेली असतील त्या लोकांना माझ्या मच्छीन्द्रनाथ मल्टीस्टेट मधून पैसे देतो त्या लोकांचे चेक आल्यावर आपण परत घेऊत असे सांगून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला.

No comments