Breaking News

आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली कोयता बंद' संपाची धार अधिक तीव्र करणार - आ. गोपीचंद पडळकर


आष्टी : ऊस तोडणी मजुरांना माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांच्या कामाचे दाम त्यांना मिळणे आवश्यक आहे. कारखानदार वर्षानुवर्षे या मजूर,मुकादम आणि वाहतूकदारांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी ऊस तोडणी मजूर ,मुकादम आणि वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखानदारांची संघर्ष केला त्या प्रकारचा संघर्ष सुरेश आण्णा धस करत आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून दर वाढ झालेली नाही आ.सुरेश आण्णा धस यांनी या ऊसतोड कामगारांच्या दरवाढीबाबत विशेष अभ्यास केला आहे. कारखानदारांना मिळणाऱ्या नफ्याचा ताळेबंद जाहीर झाला पाहिजे. मजुरांचे जीवावर चालणाऱ्या या साखर कारखानदारांनी मुजराकडे माणूस म्हणून पहावे. यासाठी आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड कामगारांच्या दरवाढीसाठी कोयता बंद  महाराष्ट्र राज्यभर संपाची हाक दिली असून हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन आ. गोपीचंद पडळकर यांनी केले. कवठेमहांकाळ जि. सांगली येथील चर्चासत्रांमध्ये ते बोलत होते.


ऊसतोड कामगारांची पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही.ऊसतोडणीसाठी यंत्र आणले जात आहेत. त्यांना मनमानेल तो भाव दिला जात आहे.परंतु जनावरांसारखे राबणाऱ्या मजुरांना कमी भाव दिला जातो हे दुर्देवी आहे. आ. सुरेश धस हे माजी मंत्री आहेत. तरीही ऊसतोडणी मजूर मुकादमांनी वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत आमच्या भागात त्यांनी दौरा केला आहे. त्यांना मदत करावी यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आदेश दिल्यामुळे मी त्यांचे सोबत आहे. हे आंदोलन त्यांनी निर्धारपूर्वक लढावे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळत असून 'कोयता बंद' संप संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात करण्यात येणार आहे. त्यसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन राज्यभर करणार आहोत .त्याच बरोबर ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना न्याय मिळवूनच देणार असल्याचे शेवटी आ. पडळकर यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरआ.सुरेश धस, जनविकास संघटनेचे हरिदास लिंगडे,आप्पा साहेब शिंदे,तात्यासाहेब हुले,दतोबा भांगे हे उपस्थित होते.


No comments