Breaking News

सिरसाळा ग्रामस्थांच्या वतीने नुतून ग्रामसेवक हरिश्चंद्र घुले यांचा सत्कारपरळी वैजनाथ :  तालुक्यातील मौजे सिरसाळा ग्रामपंचायतच्या आज दि.29 सप्टेंबर रोजी ग्रामसेवक हरिश्चंद्र  घुले यांनी पदभार स्विकारला आहे. दरम्यान हरिश्चंद्र घुले यांचा सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन व फेटाबांधून सत्कार करण्यात आला आहे.

       

परळी तालुक्यातील मौजे सिरसाळा येथील ग्रामसेवक अब्दुल शेख यांची बदली झाली होती. त्यांच्या बदली झाल्यानंतर सिरसाळा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक पदी हरिश्चंद्र घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामसेवक हरिश्चंद्र घुले यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. यावेळी सरपंच रामदादा किरवले, उपसरपंच इम्रानखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य संतोष पांडे, शेख नेहाल, फेरोज पठाण, नदिम शेख, कपील किरवले, ग्रामपंचायत कर्मचारी विश्वांभर देशमुख, लिपीक पठाण आसेफ, संगणक परिचालक सलमान पठाण, केशव वाव्हळे व आदी उपस्थित होते.


No comments