Breaking News

ऊसतोड कामगांराना तोडणी दर वाढवून चारशे रूपये द्या नसता संप पुकारू -तुळशीराम आवाड


आदर्श मुजमुले । वडवणी 
ऊसतोड कामगार व ठेकेदार यांच्या दरवाढीसाठी शासणाकडुन प्रतेक वर्षी फक्त आश्वसाने दिली जातात माञ त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत त्यामुळे या वर्षी तोडणी दर चारशे रू द्यावा नसता मानवी हक्क अभियान प्रणीत ऊसतोड कामगार संघटनेच्या वतिने संप पुकरण्याचा जिल्हा सचीव तुळशीराम आवाड यांनी दिला आहे ऊसतोड कामगार व ठेकेदार यांच्या दरवाढीसाठी अनेक वर्षा पासुन शासनाकडे मागणी सुरू आहे. 
 प्रतेक वर्षी काहीतरी पोकळ आश्वासंन देऊन थोडी फार दर वाढ केली जावुन तोंडाला पाने पुसली जातात.या वर्षी तर परीस्थीतीमुळे ऊसतोड कामगारावर गंभीर संकट कोसळले आहे गावात रोजगार लहान मोठे व्यवसाय बंद आहेत आठ महीने रोजंदारीवर पोट भरणारा कामगार ऊपाशी त्यातच गाडी मालक व कारखाना ऊचल देत नाही त्यामुळे आजुनही ऊचलीच्या प्रतिक्षेत कामगार आहे माञ शासनाने अनेक वेळेस दर वाढीचे आश्वासन दिले तेही पुर्ण केली नाही अशा कोरोना परस्थीतीमुळे ऊसतोड कामगारावर भयानक परस्थीती येवु शकते त्यामुळे शासनाने या परस्थितीचा गांभिर्यपूर्वक विचार करून ऊसतोड कामगारांना चारशे रू प्रतिटन ऊसतोडणी दर द्यावा नसता तीव्र संप पुकारू असा ईशारा मानवी हक्क अभियान प्रणित ऊसतोड कामगांर संघटनेचे जिल्हा सचीव तुळशीराम आवाड यांनी दिला आहे.

No comments