Breaking News

कृषिकन्या ऋतुजा शिंदेनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवले जीवामृत प्रात्यक्षिक


 के. के. निकाळजे । आष्टी
तालुक्यातील चिखली गावामधील  व परिसरातील शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यास दौर्‍या अंतर्गत कोल्हापूर येथील कृषी  महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा काकासाहेब शिंदे हिने परिसरातील शेतकऱ्यांना जीवामृत कसे तयार करावे आणि त्याचे फायदे हे काय आहेत याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.

      महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत डॉ. पीएन रसाळ डॉ.बी, टी कोलगणे, प्राध्यापकसी, व्ही मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या ऋतुजा काकासाहेब शिंदे या विद्यार्थीनीने आष्टी तालुक्यातील चिखली गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी याबद्दलची माहिती दिली, पिकावरील कीड व कीड व्यवस्थापन, पिकांसाठी आवश्यक असणारी सेंद्रिय खते याचा वापर सेंद्रिय खते व औषधांचा वापर केल्याचे फायदे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी का वळावे व त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठे बाबतही माहिती यावेळी ऋतुजा शिंदे हिने शेतकरी व महिलांना दिली, तसेच आपण उत्पन्न केलेल्या शेतीमाला पासून घरच्या घरीच विविध पदार्थ तयार करून ते पदार्थ जास्त काळ कसे टिकवता येतील त्याची साठवणूक कशाप्रकारे करून त्याचे जीवनमान कसे वाढवावे व त्यासाठी बाजारपेठ कशी सहज उपलब्ध होईल याबाबतही सविस्तर माहिती शेतकऱ्यांना व महिलांना दिले आहे.

No comments