Breaking News

शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार


केज तालुक्यातील घटना ; नराधमाला ठोकल्या बेड्या, तीन दिवसाची मिळाली पोलीस कोठडी

गौतम बचुटे । केज :

शौचास गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने  बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या असून न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. 

मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथील ३२ वर्षीय विवाहित महिला तिच्या शेतातील बाजरीच्या पिकातदि. 20 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शौचास गेली होती. त्यावेळी गावातील नराधम बाळकीसन चौरे तिच्या मागून शेतात गेला. त्याने पिडितेच्या हाताला धरून खाली पडले व तोंड दाबून तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या अत्याचार प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून तो नराधम बाळकीसन शेषेराव चौरे वय ३८ वर्ष यांच्या विरुद्ध गु.र.नं ४००/३०२० भा.दं.वि. ३७६ व ५०६ नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी नराधम आरोपीला अटक केली. आरोपीला ३० सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.No comments