Breaking News

मेहकरी धरणातील जलपूजनासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे - तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी

आष्टी : आष्टी तालुक्याला वरदान ठरलेले मेहेकरी धरण आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नाने सीना मेहकरी  योजनेतून प्रथमच शंभर टक्के भरले असून या धरणातील पाण्याचे जलपूजन कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शुभहस्ते  व माजी आ. साहेबराव दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी मेहेकरी धरण येथे संपन्न होणार आहे तरी मेहकरी धरण लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे. 

    
 आजही आष्टी तालुक्यातील  मेहकरी वगळता एकाही तलावात पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा नाही ,मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, परंतु पुढील संकट ओळखून आमदार बाळासाहेब आजबे यांनी सीना धरणातून वाया जाणारे जास्तीचे पाणी मेहकरी धरणात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून त्यास मंजुरी घेऊन हा  प्रकल्प 100% भरून घेतला त्यामुळे या लाभ क्षेत्रातील 20 ते 25 गावांना याचा फायदा होणार आहे, आज मेहकरी धरण येथे होणाऱ्या जलपूजन समारंभासाठी परिसरातील शेतकरीनी  उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.

No comments