Breaking News

आष्टी- पाटोदा- शिरूर- तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू- आ. आजबे


के. के. निकाळजे । आष्टी

मागील दहा पंधरा दिवसांमध्ये आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यातील काही भागांमध्ये सततच्या व मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कांदा, उडीद, सोयाबीन ,ऊस ,फळबाग, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यासंबंधी नामदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाने शासनाने बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम  सुरू झाले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

   

पाटोदा व शिरूर तालुक्यातील पंचनामे  करण्याचे काम दोन दिवसापासून सुरू झाले असून आष्टी तालुक्या बाबतीतही आपण जिल्हाधिकारी साहेब यांना बोललो असून आज पासून पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू होणार आहे, आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा व धनोरा महसूल मंडळात जास्त नुकसान झाले आहे या भागातील शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडून आपल्या नुसकान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, ज्या गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पिक विमा कंपनीच्या पोर्टलवर  नोंद करावी, ज्या शेतकऱ्यांचे खरच मोठे नुकसान झाले आहे अशा शेतकरी तत्काळ पंचनामे करून घ्यावेत तशा सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी यावेळी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांचे जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व त्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा पोर्टल वर आपल्या नुकसानीची माहिती नोंद  करावी लागणार आहे तरच पिक विमा मिळण्यास मदत होईल, त्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनीआपल्या नुकसानीची नोंद करावी, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध आहेत. असे   तालुका कृषी अधिकारी, राजेंद्र सुपेकर म्हणाले.No comments