Breaking News

शिवव्याख्याते ज्ञानेश्वर सोळंके यांची महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड


दिंद्रुड :  माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील ज्ञानेश्वर भागवतराव सोळंके यांची महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शिवराज आनंदकर यांनी ज्ञानेश्वर सोळंके यांच्या निवडीचे प्रमाणपत्र नुकतेच दिले असून नाकलगाव सह परिसरातील सांप्रदायिक, अध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील जनतेने सोळंके यांचे अभिनंदन केले आहे.

ज्ञानेश्वर भागवतराव सोळंके हे बाल व्याख्याते म्हणून बीड जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहेत. किर्तन, प्रवचन, शिव व्याख्यान आदी कलांमध्ये पारंगत असलेले सोळंके हे वयाच्या पाचव्या वर्षापासून अध्यात्मिक क्षेत्रात काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शिव व्याख्यान देत ज्ञानेश्वर सोळंके यांनी मोठा चाहतावर्ग उभा केला आहे.


No comments