Breaking News

पोलिस उपनिरीक्षक विजेंद्रराजे नाचण


दिंद्रुड : येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक महीण्यापासुन रात्रंदिवस अवैधरीत्या माफीयांची दिंद्रुड सह हद्दीत गुंडगिरी, हाना मारीत वाढ झाली होती. पोलिस स्टेशनला खरी गरज असणाऱ्या कर्तव्यदक्ष, दबंग अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विजेंद्रराजे नाचण यांची बदली पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे झाल्याने सर्वसामान्यांत नाराजीचा सूर उमटला.
पीएसआय नाचण दिंद्रुड पोलीस स्टेशनला रूजू झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. अनेक गावगुंडांना त्यांनी खाकी दाखविली होती, तेव्हा पासून खाकीला सर्व सामान्य माणूस आदराने पोलीसाकडे पाहु लागले होते. पि एस आय नाचण हे दबंग सिंघम नावाने पंचक्रोशित परिचीत झाले होते व त्यांच्यामुळे गावोगावी असणारी गुंडगिरी कमी झाली होती. अशा पोलिस अधिकाऱ्याची दिंद्रुड पोलीस स्टेशनला खरी गरज असताना प्रशासनाने त्यांची बदली केल्याने सर्वसामान्य जनतेत प्रशासनाविषयी रोष व्यक्त  होताना दिसून येत होता. प्रशासनाने पि एस आय नाचण यांची बदली रद्द करून येथेच राहु द्यायला पाहिजे, अशी चर्चा सामान्य लोकांमधुन ऐकायला मिळत आहे. दिंद्रुड पोलीस स्टेशनला पुन्हा एकदा दबंग अधिकारी लाभेल का... ? यावरून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

1 comment: