Breaking News

कंत्राटदाराला रस्ता नसेल करायचा तर काळ्या यादीत टाका - शिवसंग्राम नेते साबळे


काळेगावचा रोड कंत्राटदाराने एक वर्षांपासून रखडवला

बीड : तालुक्यातील ढेकणेमोहा ते काळेगाव हवेली रस्ता नियम डावलून होत असल्याने जागरूक ग्रामस्थांनी हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत काम थांबवले मात्र कंत्राटदाराला आपले पितळ उघडे पडले असे वाटल्याने हे कामच थांबवण्याचा प्रताप त्याने केला. गेल्या वर्षभरापासून हे काम थांबलेले असून २५ वर्षांपासून प्रतीक्षा असलेला रस्ता रखडलेला आहे. या रस्त्याचे काम सुरु व्हावे यासाठी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे व तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सर्कलप्रमुख बळीराम थापडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल काळेगाव येथील ग्रामस्थ व शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत काम सुरु करावे अन्यथा या ठिकाणी काम दिले गेलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अरुण साबळे, लहू डोके, अण्णासाहेब डोके, किशोर गवळी, दत्ता पवार, सुग्रीव्ह पवार आदींची उपस्थिती होती. 

No comments