Breaking News

नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेतर्फे डान्स क्लास, थिएटर उघडण्याची मागणी!


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेतर्फे पुण्यातील डान्स क्लासेस आणि थिएटर उघडण्यासाठी सरकारला विनंती करण्यात आली. या प्रसंगी परिषदेच्या सर्व सभासदांनी भारतीय नृत्याचा पारंपरिक वेशभूषा करून कलाकारांच्या प्रातिनिधिक परिस्थितीचे प्रदर्शन घडवले. 
घराचे  इ.एम.आय, क्लासेसचे भाडे, कार्यक्रम नसल्याने हातात पैसे नाहीत. अश्या  विवंचना मध्ये अडकलेल्या परिस्थितीत क्लासेस उघडण्यासाठी आणि थिएटर उघडण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली.  या प्रसंगी परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. मेघराज राजेभोसले, जतीन पांडे, रत्नाकर शेळके, आशुतोष राठोड, मुकेश गायकवाड, राहुल साठे, गिरीजा पाटील, दीपक सादिने , बालाजी गौला , राजू परदेशी, विकास कुन्नेकर, आदी कलाकारांनी हे आंदोलन यशस्वी करण्यात व विशेष मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.

No comments