Breaking News

"सामना"तून वंचितांच्या ऐक्याला खीळ घालण्याचं चमत्कारिक तंत्र...

एरव्ही सामनाच्या अग्रलेखातून हिंदुत्व विरोधी मतांचा खरपूस समाचार घेत टीका - टिपणी केली जाते. मात्र वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकरांनी पंढरपूर मधील विठ्ठला मंदिर खुल करण्यासाठी केलेल्या अनोख्या आंदोलनाचं कौतुक करून  "वंचितचे पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांचं स्वागत आहे". अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर पहिल्यांदा फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.  "सामना"तून वंचितच्या ऐक्याला खीळ घालण्याचा पुन्हा चमत्कारिक तंत्र हाताशी धरून वंचितांच्या नेतृत्वाला कोंडीत पकडण्याचा डाव साधला जातोय. हे सिद्ध होतेय. मात्र बौद्धांसह वंचित समूह यांच्या विचाराला भीक घालण्याएवढी दूधखूळी राहिली, नाही हेही सामनाने जाणले पाहिजे.  सामनाच्या अग्रलेखात काय लिहलं, ते जाणून घेऊया..!

नव्या दिंडी-पताका 
अँड. आंबेडकरांची वारी 
सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. ईतके असुनही अँड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदीरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अँड आंबेडकरांनी नामदेव पायरी चेही 
दर्शन घेतल्याचे समजते. देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच नामदेवाची पायरी म्हणुन प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार अँड प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माउलीचे दर्शन घेऊन केला. कपाळास बुक्का चंदन लावुन अँड आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. अँड आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल. असं सामना मधून म्हटलं गेलं आहे. 


लॉक डाऊन मुळे जनतेचे हाल होत आहेत. देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. बेरोजगारी  घटण्या ऐवजी ती अधिकचं वाढली आहे. उपासमारीच्या प्रश्नाने जनता चिंताग्रस्त झाली आहे. परंतू, लॉक- अनलॉकच्या खेळात काय बंद- खुल आहे, याकडं डोळे लागले आहेत. ही देशातील तमाम राज्याची एक सारखी स्थिती आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याला हरवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने गत पाच महिन्यांपूर्वी लॉक डाऊनचा निर्णय जाहीर करून त्याच पालन करण्याचं राज्य सरकार सह जनतेला बंधनकारक केलं होतं. मात्र यातून नामनिराळे झालेलं केंद्रातील भाजपा सरकार मात्र जिथं भाजपाची सत्ता नाही, त्या राज्यात विरोधात बसलेले भाजप नेते मंडळी तेथील सरकारला कोरोना आणि लॉक डाऊन काळात मिळेल त्या संधी वरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. 

अगदी त्याच प्रमाणे ऍड. प्रकाश आंबेडकर बौद्ध धम्माचे उपासक आहेत, मात्र ते राज्यात वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करतात. त्यामुळे राज्यातील तमाम बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या ऍड. आंबेडकर यांनी पंढरपूर मधील माऊलींच्या मंदिरात कपाळास बुक्का चंदन लावुन अँड आंबेडकर गेले किंवा एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. त्यामुळे वंचितचे पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांचं स्वागत आहे असं म्हणणे म्हणजे वंचितांच्या ऐक्याला खीळ घालण्याचं एक चमत्कारीक तंत्रचं सामना मधून प्रकट झाल्याची चर्चा होत असून वंचितांच्या या नेतृत्वाला कोंडीत पकडून परस्परविरोधी जनभावना तयार करण्याचं काम केलं जातेय. मात्र जनता कोरोनामध्ये होत असलेल्या राजकारण ओळखायला दूध खुळी राहिली नाही हे मात्र नक्की..!

1 comment: