Breaking News

ऊसतोड कामगार, मुकादमांच्या प्रश्नावर आ विनायक मेटे आक्रमकसभागृहात मांडला मुद्दा; सरकार, लवाद आणि साखर संघाने तात्काळ प्रश्न मार्गी लावावा

मुंबई :  ऊसतोड कामगार, मुकादमांनी भाववाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. एकही कामगार ऊसतोडीसाठी गेला नाही तर कारखाने सुरूच होणार नाहीत. साडेआठ लाख ऊसतोड मजुरांच्या भवितव्याचा प्रश्न या मुद्द्याशी असल्याने सरकार, लवाद आणि साखर संघाने सर्वांना विश्वासात घेत हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी काल विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली आहे. आ विनायक मेटे हे ऊसतोड प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे या वेळी दिसून आले.
   कोरोनाच्या पार्शवभूमीवर ऊसतोड कामगारांना गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला होता. आता याच ऊसतोड कामगारांना कामावर परत जायचे आहे. मात्र भाववाढीबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. ऊसतोड कामगारांच्या विम्यासह आरोग्य विषयक सर्वच बाबींमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. सरकार यासंदर्भात काय करणार आहे? असा प्रश्न यावेळी आ विनायक मेटे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. आ विनायक मेटे यांनी यावेळी सभापतींचे लक्ष वेधून घेत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने भूमिका मांडली.

No comments