Breaking News

निराधार योजनेला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात यावे - बसपाचे कापसे यांची मागणी


बीड :  संजय गांधी निराधार योजनेला साविञाबाई फुले हे नाव देणयात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सतिष कापसे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
 देशातील सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे कामाची सुरुवात या देशामध्ये सर्वप्रथम सुरू केली आहे.जेव्हा महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.   महिलांसाठी जिवन जगणे गुलामीचे होते चुल आणि मुल अशी पध्दत होती. पतीच्या निधनानंतर महिलेच्या डोक्यावरील सर्व केस काढून तिच्या विद्रुपीकरण केले जात होते. तिचे केशवपण करून तिला  वेशालयात ठेवले जात होते .विधवा पुनर्विवाह ची सुरुवात केली. परित्यक्ता महिलांना  आश्रय दिला. बालविवाहास विरोध केला. बालविवाह प्रतिबंधक कायदा सक्तीचा करण्यात यावा करिता भुमिका ब्रिटिश सरकार कडे महात्मा फुले यांनी मांडली व अमंलबजावणी करायलाही भाग पाडले.  विवाह च्या अगोदरच एखाद्या नराधमाने बलात्कार व अत्याचार केलेल्या  महिला गरोदर राहिल्यास त्या आत्महत्या करीत असे अशा महिलांना आश्रय देऊन   त्यांचा संभाळ करण्याचे महान कार्य महात्मा फुले व माता सावित्रीबाई फुले यांनी केले होते.   मनुवादी अनिष्ट प्रथा रुढी परंपरेने महिलांना अन्याय अत्याचारांना ग्रासले होते.  त्या  काळात महिलांना शिक्षणाची द्वारे बंद होती. स्त्रियांना कोणताही अधिकार नव्हता तिचा उपभोगा करिता वापर केला जात होता.  म् अशा परिस्थितीत पुण्यासारख्या सनातनी शहरांमध्ये सन 1848 मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या  सामाजिक शैक्षणिक कार्यामुळेच आज सर्व मुली शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच आज महिलांना न्याय मिळाला आहे.  मात्र महापुरुषांच्या या कार्याची दखल  सरकारच्या मनुवादी विकृत्तीमुळे आत्तापर्यंत कोणत्याच महापुरुषाचा मान सन्मान या राज्यात झाला नाही.  देश स्वातंञ होवुन  70 वर्षांपासून महापुरुषांचे कार्याची दखल घेतली नाही. याचा आम्ही निषेध करत आहोत .मात्र आपण राज्य चालवत असताना सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन काम करत असाल तर बहुजन समाजातील महापुरुषांचा सन्मान करण्याकरिता त्यांनी  केलेल्या कार्याची माहिती संपूर्ण विश्वाला माहिती करून देण्याकरिता आज तुम्हाला त्यांच्या कार्याचा वसा जिवंत ठेवण्याकरिता संजय गांधी निराधार योजनेचे नाव बदलून या देशांमध्ये खऱ्या अर्थाने महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या दांपत्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा सन्मान करावाच लागेल.
करिता संजय गांधी निराधार योजनेचे नाव बदलून माता सावित्रीबाई फुले निराधार योजना असे नाव देण्यात यावे.
अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बसपा जिल्हा प्रभारी सतीश कापसे बीड यांनी प्रसिध्दी पञक द्वारे केली आहे. 

No comments