Breaking News

शेतकऱ्यांच दुःख बघा अन् हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करा- खा. डॉ. प्रितमताई मुंडे


संसद अधिवेशन संपताच खासदार शेतकऱ्यांचा बांधावर दैठणा राडी शिवारात केली नुकसान पाहणी

अंबाजोगाई : 

बीड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे, शेतकऱ्याचा खरीप हंगाम 100% वाया गेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सत्ताधारी कुठे गेले?  असं वाटत असताना, जिल्ह्याच्या खासदार मात्र संसदेचे अधिवेशन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी केली .एवढेच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख ओळखा ,आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली आहे.

            


      मागच्या पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालं .सोयाबीन, कापूस  ही पिके शंभर टक्के वाया गेले आहेत. अद्याप पर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यातील सत्ताधारी एकही शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले नाहीत. मात्र  खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच त्यांनी आज अंबाजोगाई, केज तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. अंबाजोगाई तालुक्यात दैठणा , राडी  शिवारात दत्तू कस्पटे, बळीराम गंगणे, सोपान गंगणे ,या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. यासंदर्भात बोलताना खासदार म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात खरीप पिकाचे नुकसान झाल असून सोयाबीन कापूस तूर यासारखी पिके हाती लागत नाहीत. कोरणा संकटात हे संकट फार मोठ असून शेतकऱ्यांचे दुःख आता सरकारने ओळखावं. आणि कुठल्याही परिस्थितीत हेक्‍टरी 50 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून त्यांना दिलासा दिला. या दौऱ्यात भाजपाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

           शेतकऱ्यांनी केला खासदारांचा सत्कार

     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचा कल्याण करणारा कायदा संसदेत मंजूर केल्याबद्दल दैठणा परिसरातील शेतकऱ्यांनी या दौऱ्यात खासदार प्रीतम ताई चा पुष्पहार घालून सत्कार केला या विधेयकामुळे आम्ही आता बंधन मुक्त झालो असून आमचा माला माला खुलेआम कुठे पण विक्री करता येईल या शब्दात शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या व खासदार यांचं कौतुक केलं

      खासदारांचा ताफा, अन् चर्चा

मतदार संघाच्या दौर्‍यावर असलेल्या खासदार प्रीतम ताई यांचा झंझावात, आणि दौऱ्यात वाहनांचा ताफा , पाहून अनेकांना काल स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे साहेबांची आठवण आली. कारण साहेब सहज जरी कुठे गेले, तरी त्यांच्या मागे गाड्यांचा ताफा असायचा. तसाच आज प्रीतम ताईच्चा दौऱ्याच चित्र होतं. कोवीड सेंटरला भेट , शेतकऱ्यांचा पिकाची पाहणी एकूणच झंझावात पावरफूल वाटला. 


No comments