Breaking News

शिरूर मध्ये विना मास्क फिरणाऱ्या 133 तर नियमांचे पालन न करणार्‍या 21 दुकानांवर कारवाई!

नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी किशोर सानप यांची दबंग कामगिरी

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरुर कासार शहरात विना मास्क फिरणार्‍या 55 दुचाकीस्वारांवर  कारवाई करुन 20380 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून आजपर्यंत शिरुर कासार नगरपंचायतीमार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण 133 लोकांवर कारवाई करुन 35980 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर आजपर्यंत नियमांचे पालन न करणार्‍या 21 दुकानांवर कारवाई करुन 27500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

तरी शिरुर कासार शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की विनाकारण बाहेर फिरु नये,तसेच अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडतांना मास्क परिधान करावे,तसेच दुकान व्यावसायिक यांना आवाहन करण्यात येते की दुकानामध्ये समोर ३ फुट अंतरावर दोरी बांधावी,दुकानांमध्ये Social Distancing चे पालन करावे,५ ग्राहकांची मर्यादा पाळावी , आणि सर्व शासन नियमांचे पालन करुन नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरूर कासार नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार किशोर सानप यांनी केले असून विनामास्क फिरणाऱ्यावर आणि उशिरापर्यंत दुकाना चालू ठेवणाऱ्यांवर कारवाई करतेवेळी शिरूर कासार नगर पंचायतचे लेखापाल चंद्रकांत दामोदर, इंजिनियर राहुल देशमुख व इतर सर्व कर्मचारी आणि पोलिस उपस्थित होते.

No comments