Breaking News

आमदार संदिप क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड सप्ताहाचे आयोजन


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाडांचे होणार वाटप
बीड :  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आमदार संदिप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. बीड शहरात आणि ग्रामिण भागात आ.संदिप क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्त हजारो झाडे लावली जाणार आहेत. वृक्ष लागवड, वृक्ष वाटप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने शहरातील नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रत्येकी शंभर झाडे देवून संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा 27 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवगण प्रतिष्ठान बीडच्यावतीने ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, भजन गायन स्पर्धा, उत्कृष्ट छायाचित्र स्पर्धा यासह आदी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. बीड शहरात व ग्रामिण भागात आमदार संदिप भैय्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नवगण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड तालुक्याच्या वतीने नगरसेवक, पदाधिकारी यांना झाडे वाटप करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार आहे. आ.संदिप भैय्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरी व ग्रामिण भागात जास्तीत जास्त झाडे लावून त्याची जोपसना करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने करण्यात आले आहे. 

नगरसेवकांना शंभर झाडांचे होणार वाटप

बीड शहरात आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवगण प्रतिष्ठान बीड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रत्येक शंभर झाडे देवून त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाणार आहे. शहरातील व ग्रामिण भागातील आवश्यक अशा ठिकाणी ही वृक्ष लागवड होणार असून याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हा

आ.संदिप भैय्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष वाटप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या चांगल्या कार्यात आणि स्तुत्य उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत वृक्ष लागवड करावी. त्याची जोपसणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नवगण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments