Breaking News

चाहुर.. चाहुर..चांगभलं... कोरोना आला, घरात चला..!


पारंपारिक बैल पोळ्यावर ही कोरोनाचे गंडांतर-राजेंद्र मस्के
बीड :  बैल पोळा हा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा पारंपरिक सण. रक्ताचं पाणी करुन शेतकरी शेती करतो .तेव्हा त्याचा मित्र म्हणून बैल आपल्या घामाचं योगदान अविरतपणे देत असतो. शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करत असतो.या मुक्या प्राण्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण शेतकरी राजा दिमाखात साजरा करतो. परंतु आज दुर्दैवाने कोरोनाच्या थैमानामुळे बैल पोळ्यावर ही गंडांतर आले. अत्यंत साधेपणाने पोळा साजरा करावा लागला.विलक्षण ,व मनाला वेदना देणारा अविस्मरणीय आजचा पोळा शेतकरी बांधवांसाठी ठरला आहे .असे शल्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले आहे
आज पालवण येथे राजेंद्र मस्के व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ जयश्री मस्के यांनी बैलांची पूजा करून साधेपणाने पोळा साजरा केला.यावेळी गावातील शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
मागे तीन-चार वर्ष प्रचंड दुष्काळ परिस्थिती होती गुरांना चारा पाणी उपलब्ध नव्हता अशा परिस्थितीतही  आपण गुरांच्या छावण्या उभारून पशुधनाचे संवर्धन करून शेतकरी बांधवांना आधार दिला भीषण दुष्काळ परिस्थितीतही छावणीतील गुरांसाठी शाही थाटात सार्वजनिक पोळा साजरा करून बैला विषयी  कृतज्ञता व्यक्त केली. दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आनंद व दिलासा दिला. दुष्काळाचा चटका शेतकरी बांधव व त्यांच्या गुरांना जाणवू दिला नाही .
यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले सर्वत्र पीक पाण्याची सुबत्ता दिसून येत आहे परंतु दुर्दैवाने केवळ कोरोना महामारी मुळे शेतकऱ्यांना सार्वजनिक व थाटामाटात पोळा साजरा करता आला नाही हे मोठे नियतीने मांडलेले दुर्दैव वाटते. अशा पद्धतीने बैलपोळा वर आलेले संकट शेतकऱ्यांना आठवत नाही किंवा बैलपोळा साजरा झाला नाही असे आढळून आलेले नाही. यंदा मात्र हा विलक्षण योग शेतकऱ्यांच्या वाट्याला आला.यावर्षी हिंदूंच्या प्रत्येक सणवर बंदी आली. चहुकडे कोरोनाचे संकट घोंगावत असताना शेतकरी बांधवांनी ही प्रशासनाचे सर्व नियम पाळून बैलपोळा अत्यंत साधेपणाने साजरा केला. निसर्गाचे दान लाभले परंतू नियतीने आनंद व्यक्त करू दिला नाही याचे दुःख शेतकरी बांधवांच्या डोळ्यांमध्ये चालताना दिसले. चाहुर.. चाहूर.. चांगभलं.. कोरोना आला घरात चला अशी ललकारी देत बैलपोळा साधेपणाने व सुरक्षितपणे साजरा करण्यात आला.

No comments