Breaking News

चांगलं काम करणा-यांना भारतीय जैन संघटना प्रोत्साहन देत - आमदार सुरेश धस

आष्टी-भारतीय जैन संघटनेच्यावतीने आ.सुरेश धस यांचा सन्मान करतांना संघटनेचे पदाधिकारी.
आष्टी-भारतीय जैन संघटनेच्यावतीने आ.सुरेश धस यांचा सन्मान करतांना संघटनेचे पदाधिकारी.
के. के. निकाळजे । आष्टी 
सामाजात काम करत असतांना आपल्या कामाची दखल समाजात कोणीतरी घेत असतेच पण आज पर्यंत प्चांगले काम करणा-यांना भारतीय जैन संघटना प्रोत्साहन देत असते,आज माझा झालेला सन्मान म्हणजे अधिक काम करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

             आष्टी तालुका भारतीय जैन संघटना व तिरुमाला ग्रुपच्या वतीनं शहरातील अँटिजेन टेस्टच्या केंद्रावरील काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तसेचमहसूल, नगर पंचायत, पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक व आमदार सुरेश धस यांचा गुरुवारी ((दि.२०) सत्कार येथील कन्या प्रशाळेत 
करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी तहसिलदार वैभव महिद्रकर, भारतीय जैन संघटनेचे संजय मेहेर, भारत मुरकुटे, आदींची उपस्थिती होती. 

सत्काराला उत्तर देताना  आ. धस म्हणाले की, भारतीय जैन संघटना नेहमी सामाजिक काम करणा-यांची वेळोवेळी दखल घेत आहे.आज देशात कोरोना सारख्या भयंकर रोगामुळे सर्वञ विस्कळीत पणा आलेला आहे.आजही या रोगावर कसल्याही प्रकारचा ईलाज नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना आणि त्यांना सहकार्य करणारे इतरांनी जे काम हातात घेतले आहे त्याला निश्चितच लवकरच यश मिळेल आणि देश पुर्वपदावर येईल तसेच माझा सन्मान यावेळी आपण केला हा सन्मान म्हणजे अधिक काम करण्याची प्रेरणा देणारा असेल असेही आ. धस शेवटी म्हणाले. यावेळी
बाळू मेहेर, विजय मेहेर, नवनीत कटारीया, रवि मेहेर, सुनिल मेहेर, राहूल मुथ्था, गिरीष जोगी, राजेंद्र जोशी, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर मुथ्था, सचिव प्रितम बोगावत, राहूल शिंगवी, पारस मेहेर, इश्वर कटारिया, अमोल भंडारी, वैभव लाहोटी, पञकार सचिन रानडे,  प्रविण पोकळे, अनिरूध्द धर्माधिकारी आदी उपस्थीत होते.

No comments