Breaking News

अल्पसंख्याक समाजातील तरुणांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा :- सय्यद सलमान अली

बीड जिल्ह्यासाठी राज्य सरकार कडून भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मंजूर

बीड : येणाऱ्या काळात राज्यातील पोलीस खात्यात तब्बल १२ हजार पदासाठी पोलीस भरती होणार आहेत. पोलीस सेवेत अल्पसंख्याक समाजाचे प्रमाण वाढले पाहिजे या साठी अल्पसंख्याक मंत्रालय कडून राज्यात १४ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या केंद्रांवर अल्पसंख्याक(मुस्लिम, बौद्ध,पारसी,जैन,सीख,ईसाई व ज्यू) समाजातील इच्छुक उमेदवारांना मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहेत. बीड मध्ये पण एक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक तरूणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसंग्राम चे अल्पसंख्यांक शहर उपअध्यक्ष सय्यद सलमान अली यांनी केला आहे.या संबंधी अधिक माहिती अशी आहे की येणाऱ्या काळात होणाऱ्या पोलीस भरतीत पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या साठी राज्यात १४ जिल्ह्यात केंद्र मंजूर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्य़ामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे, यासाठी निवडप्रक्रिया सुरू झाली असून या प्रशिक्षण केंद्रात किमान ३०, तर कमाल १०० जणांना प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे,त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या केंद्रात बीड जिल्ह्याचा समावेश असुन बीड येथील "आझाद हिंद बहुउद्देशीय संस्था" कामखेडा बीड या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान ३०, तर कमाल १०० जणांना भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात येईल. परिक्षेच्या तयारी साठी मोफत साहित्य पुरवण्यात येईल.
यासाठी निवडप्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील इच्छुकांनी "आझाद हिंद बहुउद्देशीय संस्था" कामखेडा बीड चे शेख मुसा सर यांच्याशी संपर्क करावे. असे आवाहन शिवसंग्राम चे अल्पसंख्यांक शहर उपअध्यक्ष सय्यद सलमान अली यांनी केले आहे.
सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरू असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरू करण्यात येईल.

2 comments: