Breaking News

लालपरी ५ महिन्याने धावली…!


बीड बस्थानकात प्रवाशी झाले दाखल,पहिली बस औरंगाबाद रवाना

बीड :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून ६ महिन्यांपूर्वी प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी राज्य परिवाहन महामंडळाच्या बस डेपोत लालपरी अडकून पडली. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. गुरुवारी जिल्ह्याबाहेर एसटी बसला प्रवास करण्याची अनुमती देण्यात आल्यानंतर  बीड बस्थानकात प्रवाशी दाखल झाले. यावेळी प्रवाशांना घेवून औरंगाबादला जाण्यासाठी लालपरी मार्गस्थ झाली तर जिल्हांतर्गत गेवराईकडे जाण्यासाठी धाऊ लागली होती. बसमध्ये सोशल डिस्टन्स पाळून प्रवाशांची वाहतूक केली जाणार असून एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी बसवण्यात आले होते.  

   
बीड बसस्थानकात दाखल झालेले प्रवाशी
मार्च महिन्यापासून देशात कोरोना पेशन्ट सापडू लागले. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन करण्याचा निर्णय केेंद्र आणि राज्य सरकारने घेतला. एसटी महामंडळाच्या बसेसही पूर्णत: बंद करण्यात आलेल्या होत्या. मध्यंतरी जिल्हाअंतर्गत एसटी बसेस सुरू केल्या होत्या मात्र संचारबंदी असल्यामुळे या एसटी बसेसच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा बस बंद करण्यात आल्या. रात्री राज्य सरकारने राज्यात महामंडळाच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाबाहेरही आता बसमध्ये प्रवास करता येणार असून आज सकाळी बीडच्या डेपोमधून पहिली गाडी जिल्ह्याबाहेर औरंगाबादसाठी सोडण्यात आली तर जिल्हाअंतर्गत गेवराईला सोडली गेली. सोशल डिस्टन्स पाळून प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार आहे. एका गाडीममध्ये २२ प्रवासी बसवण्यात येणार. महामंडळाच्या या निर्णयाला बीड जिल्ह्यामध्ये अल्पसा प्रतिसाद मिळाला असल्याचे आज दिसून आले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यभरात एसटी बसेसच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. 

No comments